टी टी चा इंजेकॅशन कधी घ्यावे
आज लोकांमध्ये मोठा प्रश्न पडलेला असतो काही लागले की ते टी टी चे इंजेकॅशन घ्यायला धावत पळत डॉक्टर कडे येतात कारण सगळे जण बोलतात 24 तासाच्या आत टी टी चे इंजेकॅशन घ्यावे लागते
खरे तर तुम्हाला ही खात्री करून घेतली पाहिजे की तुम्ही स्वतः किती सुरक्षित आहात धनुर्वात पासून ( हा आजार मातीमध्ये असलेले गंजलेले खिळे , लोखंडी पत्रे, यांनी झालेली जखम आणि अपघात मोठी/छोटी जखम जी मातीने दूषित झाल्यामुळे होतो)
आणि या पासून सुरक्षित राहण्यासाठी आपण आधीच टि टि चे इंजेक्शन घेतले पाहिजे
जर तुम्हाला लहानपणा पासून टी टी चे इंजेकॅशन वयाच्या 10 वर्षापर्यंत (किमान 6-7 डोसेस) राष्ट्रीय लसीकरणाद्वारे टी टी मिळाला असेल तर वयाच्या 20 वर्षापर्यंत तुम्हाला टी टी चे इंजेकॅशन घेण्याची गरज नसते पण डॉक्टर एक बुस्टर शॉट म्हणून एक टि टी चे इंजेकॅशन देऊन टाकतात त्याने तुम्ही अजून 10 वर्षे सुरक्षित राहू शकता आणि अजून पुढची 10 वर्षे तुम्हाला टी टी चे इंजेकॅशन घेण्याची गरज नाही
जर तुम्हाला आठवत नाही की मी लहानपणी हे इंजेकॅशन लसीकरणातून नाही घेतले आहेत तर
तुम्ही स्वतःला असे सुरक्षित करू शकता त्यासाठी तुम्ही 1 टी टी चे इंजेकॅशन घेतल्यानंतर 1 महिन्यांनंतर परत 1 टी टी मग 6 महिन्यानंतर आणि मग 1 वर्षानंतर
असे करू न तुम्ही शेवटच्या इंजेक्शन नंतर 10 वर्षासाठी सुरक्षित राहू शकता आणि त्यानंतर दर 10 वर्षांनी एक टी टी घेऊन तुम्ही धनुर्वातपासून वाचू शकता
जर फक्त 2 इंजेकॅशन जे 1 महिने आड आहेत तर 3 वर्षांपर्यंत तुम्हाला संरक्षण मिळते
तिसरे इंजेकॅशन घेतल्यावर 5 वर्ष
आणि 4 थे घेतल्यावर 10 वर्ष
आणि काही लोक म्हणतात 6-6 महिन्यांनी टी टी चे इंजेकॅशन घेतले पाहिजे हा चुकीचा समज आहे
धन्यवाद
डॉ तेजेश रमेश बुतकर MBBS KEMH